नाशिक

विजेचा धक्का लागून महावितरणच्या तंत्रज्ञाचा मृत्यू; सहकारी गंभीर

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड परिसरातील आढाव मळा येथे बुधवारी (दि. 1) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. विद्युत खांबावरील बिघाड दुरुस्त करत असताना अचानक हायव्होल्टेज करंट लागून महावितरणच्या एका 28 वर्षीय तरुण तंत्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी कर्मचार्‍यावर सध्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जय मुकुंद सकट (वय 28, रा. साईनाथनगर, जेलरोड) असे मृत पावलेल्या तरुण तंत्रज्ञाचे नाव आहे. राजेश सुरेश चौरे (रा. जत्रा हॉटेल परिसर) असे गंभीर जखमी झालेल्या तंत्रज्ञाचे नाव आहे. हे दोघेही महावितरणच्या शिवाजीनगर कार्यालयात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आढाव मळा, पिंटो कॉलनी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर बुधवारी दुपारी बिघाड दुरुस्त करण्यासाठी जय सकट आणि राजेश चौरे हे दोघे खांबावर चढले होते. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक खांबामध्ये जोरदार विद्युतप्रवाह उतरला. या भीषण धक्क्यामुळे दोघेही थेट खांबावरून खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जय सकट यांची प्राणज्योत मालवली. राजेश चौरे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यरात्रीपासून शॉर्टसर्किट होत असताना पुरवठा खंडित न करता दुरुस्तीचे काम सुरू होते का? की तांत्रिक त्रुटीमुळे अचानक वीजप्रवाह सुरू झाला, याचा तपास सुरू आहे.
या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, याचा शोध घेण्यासाठी महावितरणकडून वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

चिमुरड्याचे छत्र हरपले

मृत जय सकट हा कोविड काळानंतर महावितरण कंपनीत सेवेत रुजू झाला होता. अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या जय याच्या अचानक जाण्याने सकट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ आणि अवघ्या दोन वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे. कमावता तरुण मुलगा गमावल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Mahavitran technician dies of electric shock; colleague in critical condition.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago