माझं माहेर गोकूळ

 

माय करुणा सागर
माझं माहेर गोकूळ
दुडूदुडू धावताना
रंगे लेकरांचा खेळ….

माहेर म्हटले कि प्रत्येक स्रीमनाला जाणवणारा मायेचा सुखद गारवाच…! जो शेवटच्या श्वासापर्यत तिच्यासाठी उभा असतो तिचा हक्काचा आधारस्तंभ बनून…!
माझं माहेर मनमाडचे …वडील काळाच्या पडद्याआड गेले आणि दोन भावांचा संसार तिथेच फुलतोय .आईचा आशिर्वाद आणि साथीसह… आता तिथेच सर्व स्थिरस्थावर झालेत…
दोन नाती दोन नातूच्या बडबड गितं,प्रश्न उत्तरासह आईचा वेळही कुठे जातो कळतही नाही …मलाही हवहवंसं वाटणारं माहेर सतत खुणावत असतं…जसा वेळ मिळेन संधी मिळेन तसे मीही ओढीने धाव घेतच असते भाचेकंपनी सोबत मजाच मजा रंगत जाते…त्यांच्या सोबत खेळताना पळताना लहान होवून त्यांच्याशी चिऊमाऊच्या गंप्पागोष्टी करताना जे परमसुख मिळते त्याचे वर्णन करायला दिवसही पुरणार नाही हो..एवढे गुणवान,मधूरता जपत खोडकरही,रुसवेफुगवे होतात तरीही पुन्हा जवळ येणार एवढी समजदारी एवढ्याशा वयात कशी येते आजच्या पिढीत हेही नवलच वाटते…
झोपताना जेवताना गोड भांडण ठरलेलेच..आत्याला म्हणजे मलाच कानात ओळोपाळीने म्हस्का, वशिला,इमोशनल टच, आमिष दाखवले जाते…दुकानात जायचं चाॕकलेट कॕटबरी घ्यायची ..काही खेळ खेळायचे …मग रात्री जेवण झाले कि प्रश्न पडतात ते आपल्यापैकी आत्याजवळ कोण झोपणार गोष्टी सांगणार वगैरे वगैरे …मग दोघी चिमुकल्या चिमण्या दोन्ही हातावर डोके ठेवून गोष्टी ऐकत केव्हा झोपी जातात मलाही कळत नाही ..त्या जीवांना आत्याच्या कुशीत सुरक्षित वाटताना मन भरुन येतं ..हा जिव्हाळा सुटत नसतोच मुळी…आत्मिक सुख म्हणता ते याहुन मोठं काय म्हणावं…!
एवढा लळा असतो आत्याभाचीचा…यातून हे उमजते कि माहेर जपता जपता ह्या चिमुकल्या इतक्यात मोठ्या होतील आणि मग ह्या माहेरवाशीन बनुन आत्या बनून याच माहेरी येतील…नात्याची ही परंपरा चालत रहाते अखंड दिव्यातल्या वातीसारखी तेवत रहाते…!
भावंड दिवसभर आपआपल्या कामात गुंतलेले असतात..रात्री सर्व एकत्र बसुन जेवण करत बोलताना वेळही पुरत नाही …तर भावजया सतत चांगले चांगले आवडते पदार्थ बनवून खाऊ घालायच्या मागे असतात…आई तर गंप्पामधे कधी भुतकाळात हरवते कधी वडलांच्या आठवणीत रमते तर कधी सगळ्या नातवंडाच्या भविष्याचा विचार करत माझ्याशी हितगुज करण्यातच समाधान मानते…नशीबाने होतकरू कष्टाळू सुना तिच्या पदरात आल्याय या आनंदात तीही त्यांची आई होवून गेलीय…
असा ममतेचा चारआठ दिवसाचा पाहुणचार करुन परतीचा प्रवास करताना पाय माहेरच्या उंबऱ्यातून बाहेर पडत नाही …पण तिच परंपरा आई समजवते . सासरी जाताना संस्काराची शिदोरी बांधत असते त्यातच परत ये लवकर म्हणत सांगते… माहेरचे दरवाजे सतत लेकीसाठी खुले असतात….आनंद घेवून येत जा सर्वत्र आनंद पेरत रहा…अजून काय हवं माहेरचं हेच धन लाख मोलाचं ते सर्व सखींना लाभत रहावो..”माहेरचं विश्व उजळत रहावो” हीच इश्वरचरणी प्रार्थणा…प्रत्येक लेकीला याहुन जास्त आणि काय हवं असतं..!

सविता दरेकर
नाशिक

Ashvini Pande

Recent Posts

घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, नंतर बायको- सासूलाही पेटवले

  घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही...     नाशिक: …

11 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

  काँग्रेस  मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…

14 hours ago

अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…

14 hours ago

नाशकातील शिवसैनिक जागेवरच : खा.संजय राऊत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…

15 hours ago

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…

15 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…

15 hours ago