बळीराजाची लगबग; आतापर्यंत 33 हजार 974 हेक्टरवर पेरणी
मालेगाव : प्रतिनिधी
यंदा कृषी विभागाने 2025-26 या वर्षासाठी 91 हजार 520 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातच दुसरीकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार शहर व तालुक्यात गत पंधरवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जमिनीत वापसा येताच शेतकर्यांनी खरीप पेरण्यांना प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतशिवारात पेरणीची एकच लगबग पाहायला मिळत आहे. आजपर्यंत 33 हजार 974 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
तालुक्यातील शेतकरी गेल्या चार ते पाच वर्षांपासून अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यानंतरही नव्या उमेदीने बळीराजा खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच शहरासह तालुक्यात बेमोसमी पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर जूनच्या दुसर्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी कृषी विभागदेखील सज्ज झाला आहे.
तालुक्यात 13 महसूल मंडळांतर्गत एक लाख 16 हजारांपेक्षा अधिक शेतकरी आहेत. खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, रासायनिक खाद्य खरेदीसाठी कृषी केंद्रावर शेतकर्यांनी गर्दी केली आहे. जमिनीत वापसा येताच दाभाडी, पाटणे, आघार, पिंपळगाव, (गा.), सौंदाणे आदींसह तालुक्यातील गावात खरिपातील मका, भुईमूग, तूर, कपाशी आदी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. काही शेतकरी पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्याने, तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करताना दिसत आहे. पेरणीमुळे शेतशिवार माणसांनी फुलून गेले असून, आजपर्यंत 33 हजार 974 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
खरीप पेरणी आकडेवारी
पीक उद्दिष्टे पेरणी
ज्वारी 647.8 35
बाजरी 18,657.4 3210
राई 22 00
मका 44313.8 22118
इतर धान्य 139.2 00
तूर 832 37
मूग 1243.4 193
उडीद 385.4 23
इतर कडधान्य 28.6 00
भुईमूग 1472.2 198
तीळ 0.4 00
सूर्यफूल 1.8 00
सोयाबीन 270.8 60
इतर तेलबीज 8.6 00
कापूस 23497.2 8100
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…