नाशिक

पिकअप-दुचाकी अपघातात एक ठार


पळाशी : नांदगाव-येवला रस्त्यावर तांदूळवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि. 18) येवला येथून नांदगावकडे जाणार्‍या चारचाकी पिकअप (एमएच 15, जेसी 2349) व नांदगावकडून भौरीच्या दिशेने जाणार्‍या दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअप रस्त्यावर उलटला. अपघातात भौरी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख आप्पासाहेब खंडू भिलोरे (वय 55) यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. अपघाताची माहिती नांदगाव पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातात मृत्यू झालेले आप्पासाहेब भिलोरे हे भौरी (ता. नांदगाव) येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख, तसेच प्रगतिशील शेतकरी होते.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago