नाशिक

मालेगाव बसस्थानकाचा लवकरच होणार कायापालट

जुने बांधकाम निष्कासित; पुनर्बांधणीसाठी 15 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर

मालेगाव : नीलेश शिंपी
राज्यमार्ग परिवहन महामंडळाची बहुतांश बसस्थानके जुनी झाली आहेत. यातील काही बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामध्ये मालेगावच्या नवीन बसस्थानकाचाही समावेश आहे. नवीन बसस्थानक व आगाराच्या डिजिटलायझेशन व पुनर्बांधणीसाठी सुमारे 15 कोटी 75 लाख रुपये शासकीय निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या बसस्थानकात जुने झालेले बांधकाम निष्कासित केले जात आहे. 18 महिन्यांत बसस्थानक पूर्णत्वास जाणार असून, 2027 अखेर शहरवासीयांना कायापालट झालेल्या बसस्थानकाचा लाभ होणार आहे.
तत्कालीन परिवहनमंत्री हसमुख उपाध्याय यांच्या हस्ते 16 जून 1979 मध्ये या बसस्थानकाचे उद्घाटन झाले होते. तत्कालीन रोजगारमंत्री पै. निहाल अहमद व राज्यमंत्री विनायकराव पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. नाशिकनंतर मालेगाव दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. शहराचा राज्यातील प्रमुख शहरांसह मध्य प्रदेश, गुजरात राज्यांशी व्यापार व उद्योग माध्यमातून व्यापक जनसंपर्क आहे. येथील बसस्थानकातून प्रमुख महानगरांसह पाचशेहून अधिक फेर्‍या होतात. हजारो प्रवासी ये-जा करतात. नवीन बसस्थानक साडेचार दशकांपूर्वीचे असल्यामुळे त्या तुलनेत सोयीसुविधा नसल्याने बसस्थानक सुविधांपासून कोसो दूर होते. बसस्थानकात मोठ-मोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी खड्ड्यांत साठून बसस्थानकाला डबक्याचे स्वरूप प्राप्त व्हायचे. यातून मार्ग काढताना प्रवाशांसह बसचालकांना कसरत करावी लागायची. यांसह बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव असून, प्रवाशांचे हाल होत होते. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी कचरा पडलेला असायचा. त्यामुळे बसस्थानकाची सुधारणा करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात होती. यासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा करून या बसस्थानकाला मंजुरी मिळविली. या नवीन बसस्थानकाची सध्याची इमारत पाडून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त इमारत बांधण्यात येणार आहे.

या असतील सुविधा
नवीन बसस्थानकाच्या इमारतीत प्रवासी प्रतीक्षालय, वाहतूक नियंत्रण कक्ष, महिला व पुरुष प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिलांसाठी हिरकणी कक्ष, पास व तिकीट आरक्षण कक्ष आदी सोयीसुविधा असतील. बसस्थानक 14 फलाटांचे राहणार आहे. यात उपाहारगृह, पार्सल ऑफिस, नाथजल, मिल्क अ‍ॅण्ड डेअरी व इतर काही व्यापारी दुकाने असे 10 वाणिज्य आस्थापना उभारण्याचे नियोजन आहे. बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावर महिला व पुरुष चालक/वाहकांसाठी विश्रांतीगृह प्रस्तावित आहे. प्रवेशद्वाराजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

16 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

16 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

17 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

17 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

17 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

17 hours ago