मालेगावात पती पत्नीची आत्महत्या
मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव शहरात पती पत्नी च्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. डी. के. चौक भागातील माऊली चौकात वास्तव्यास राहणाऱ्या पती-पत्नीने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा उघडकीस आला आहे. पंकज दिगंबर बिरारी (४५) व रेणुका पंकज बिरारी (४०) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्यांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दोघांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात हलविले.
सायंकाळच्या सुमारास बिरारी दांपत्याने आपल्या मुलास खेळण्यास पाठविले. साडेआठ वाजेच्या सुमारास खेळण्यास गेलेला मुलगा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतुन बंद होता. यानंतर त्याने शेजाऱ्यांना सांगितल्याने दोघा पती पत्नी यांना आवाज दिला परंतू काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बिरारी यांचे शालक यांना बोलावून घेतले त्यांनाही काहीही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आल्यानंतर पंकज यांनी घरातील हॉलमध्ये तर रेणुका यांनी किचनमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून शहरवासियांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…