दुचाकी खरेदीत फसवणूक करणार्‍यास बेड्या

बनावट चेकद्वारे फसवणूक

सिडको : विशेष प्रतिनिधी
बनावट चेकद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करून फसवणूक करणार्‍या दोन वर्षांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अटक केली आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल रमेश कोपरे (वय 37) याने मुंबई नाका येथील ‘मॅन्सन व्हिल्स’ या दुकानातून चेकद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली होती. मात्र, संबंधित चेक बँकेत वटवण्यासाठी दिला असता तो बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार दिली आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी मागील दोन वर्षांपासून फरार होता. फरार आरोपीचा गुन्हे शाखा युनिट 1 ने समांतर तपास सुरू ठेवला होता.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अनिल कोपरे हा ओझर येथील पगार मळा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या सूचनेनुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपीला मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्यासह गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सहभाग घेतला.

Man arrested for cheating in bike purchase

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *