मनमाड : आमिष शेख
मनमाड येथे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले होते मात्र .होर्डिंग विना परवाना लावण्यात आल्यामुळे पालिका प्रशासनाने काढले. विना परवाना होर्डिंग म्हणून कारवाई केल्याची माहिती मुख्यधिकाऱ्यानी दिली.
बंडखोर मंत्री आणि आमदारां विरुद्ध शिवसैनिकांनी घेतलेली आक्रमक भूमिका कायम असून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनमाडला ठिकठिकाणी होर्डिंग झळकले होते मात्र परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आल्याचे कारण पुढे करत पालिका प्रशासनाने होर्डिंग काढून घेतले आहे.यामुळे शहरात विवीध चर्चा सुरू असुन प्रशासनावर दडपशाही करण्यात येत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाहा व्हिडिओ: