मनमाड: यंदा पाऊस चांगला राहील आणि 5 जुनलाच उत्तर महाराष्ट्र यासह विदर्भ मराठवाडा या भागात मान्सून हजेरी लावेल असे हवामान खात्याने जाहीर केले होते हवामान खात्याचे भाकीत अगदी तंतोतंत खरे ठरले असुन आज मनमाड शहरासह आजूबाजूला असलेल्या ग्रामिण भागात पावसाने हजेरी लावली आहे.आज सकाळ पासुनच उष्णता वाढली होती आभाळ भरून आले होते आणि दुपारी अचानक पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे.पहिल्या पावसाने अनेकांना सुखावले असले तरी रविवारचा आठवडे बाजार असल्याने आणि कल्पना नसल्याने व्यापारी यांच्यासह बाजारात आलेल्याची तारांबळ उडाली आहे.बच्चे कंपनीने आज पहिल्या पावसात मनसोक्त आनंद घेतला व मनमुराद खेळून पावसाचे स्वागत केले.