तक्रारीनंतरही पालिका अधिकार्यांकडून कारवाईऐवजी केवळ आश्वासन
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहरातील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक अर्थात, मालेगाव चौफुलीवर असलेल्या मंगल टॉवरमधील व्यावसायिकांनी बांधकाम परवानगीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात विनापरवाना अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे.
अतिक्रमणधारक व्यावसायिक इतर नागरिकांना दादागिरी करतात. येथे गाडी लावू नका, पार्किंग आहे का, असे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करून नाहक त्रास देण्याचे काम करतात. धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर प्रकरणाबाबत पालिकेच्या नगररचना विभागाकडे लेखी तक्रार करूनही संबंधित विभागाचे अधिकारी विलास हुकिरे केवळ कारवाई करू, आता प्रश्न जनरल बोर्डावर घेतला आहे, असे तोंडी आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत. सत्ताधारी गटाचे नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधीदेखील अतिक्रमणाला साथ देत आहेत. त्यामुळे पालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणाला पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. याबाबत लेखी तक्रार देऊन व पाठपुरावा करूनदेखील कारवाई होत नाही. याशिवाय पोलीस निरीक्षक विजय करे यांनीदेखील अतिक्रमणाबाबत रीतसर लेखी अहवाल सादर केलेला आहे. मात्र, यालाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे. जर अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्यात येत असेल, तर सर्वसामान्य जनतेने न्याय मागावा कुणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. येत्या दोन दिवसांत कारवाई झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात व सबंधित मंत्र्यांकडे याबाबत रीतसर तक्रार करून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे तक्रारदारांंनी सांगितले आहे.
अधिकार्यांची मिलिभगत
शासकीय नियमांचे उल्लंघन होत असताना पालिका प्रशासन गप्प का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. शहरात एकीकडे किरकोळ अतिक्रमणांवर हातोडा चालवला जातो, तर दुसरीकडे अशा मोठ्या व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांना अभय का दिले जाते? यावरून नगररचना विभाग आणि अतिक्रमणधारकांमध्ये ’अर्थ’पूर्ण संबंध असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारादेखील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
अतिक्रमणाबाबत उदासीनता
नगररचना विभागाने या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आणि अनधिकृत भाग हटवणे अपेक्षित होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही पालिकेच्या वतीने ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रारदारांनी पाठपुरावा केला असता, संबंधित अधिकारी विलास हुकिरे केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहेत. या संपूर्ण प्रकरणात मुख्याधिकारीदेखील बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Manmad turns a blind eye to ‘that’ unauthorized construction
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…