नाशिक

युद्धाच्या सावटाखालीही राज्याचा इंधन पुरवठा सुरळीत

मनमाडच्या पानेवाडीतून रोज एक हजार टँकर विविध भागांत रवाना

मनमाड : आमिन शेख
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. मनमाडजवळील पानेवाडी येथील प्रमुख इंधन प्रकल्पांमधून राज्याचा इंधन पुरवठा सध्या पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. इंधन टंचाईचे कोणतेही सावट नसल्याचे चित्र आहे. मराठवाडा भागात अफवा पसरल्यामुळे तेथे नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपांवर गर्दी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सध्या आखाती देशात युद्ध सुरू आहे. यामुळे क्रूड ऑइल अर्थात, कच्च्या मालाच्या आयातीवर परिणाम होईल. यामुळे इंधनाचा तुटवडा होईल, अशी अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे. यामुळे नागरिक हे पेट्रोल पंपांवर गर्दी करत असून, विशेषतः मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. मात्र, मनमाड शहरालगत असलेल्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही मोठ्या कंपन्यांच्या प्रकल्पांतून दररोज सरासरी एक हजारपेक्षा जास्त टँकर राज्याच्या विविध भागांत रवाना होत आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी सध्या तरी या प्रकल्पांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. विशेष म्हणजे, पुरवठा साखळी मजबूत असून पानेवाडी हे उत्तर महाराष्ट्रातील इंधन वितरणाचे मुख्य केंद्र आहे. आशिया खंडामधील दुसर्‍या क्रमांकाचा प्रकल्प आहे. येथून मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. वाहतूकदारांंनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांकडून मिळणारा साठा पुरेसा असून, टँकरचे लोडिंग आणि वितरण वेळेवर होत आहे. युद्धाच्या चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष जमिनीवर इंधनाचा तुटवडा नाही. पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे, असे वाहतूकदारांनी सांगितले.

State’s fuel supply remains stable even under the shadow of war

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago