माजी नगरसेविकेच्या मुलाच्या हत्येने मनमाड हादरले
जुन्या भांडणाची कुरापत, शहरात तणावाची परिस्थिती
मनमाड : प्रतिनिधी
– माजी नगरसेविका नूतन देविदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरलं असून जुन्या भांडणाची कुरापात काढून टोळक्याने या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली असून शुभम देविदास पगारे वय( २७ ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री शुभम घरी जात असताना शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने धारदार हत्याराने वार केले त्यात गंभीर जखमी झाला होता त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपीना अटक करण्याची मागणीसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले.या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाड शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक 3/8/2024 रोजी अकरा वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जुने भांडणाच्या कारणांमुळे मयत शुभम देविदास पगारे वय वर्षे 27 व दादु बाळासाहेब सुदगे व इतर तीन अनोळखी ईसम यांच्यात तुंबळ हाणामारी झाली यात मयत शुभम देविदास पगारे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येथे उपचार चालू असताना मयत झाला आहे दादु बाळासाहेब सुदगे यांच्या वर मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्य उपचार चालू आहे
पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर शुभम वाचला असता….?
साधारण दीड महिन्या पूर्वी शुभम व दादू यांच्यात वाद झाला होता त्यावेळी देखील दोघांनी एकमेकांना मारझोड केली होती प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते मात्र नंतर हे आपापसात मिटवुन घेण्यात आले तेव्हा जर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता तर आज शुभमचा जीव वाचला असता अशी शहरात चर्चा सुरू आहे.