माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले, त्यांना हृदय विकाराचा काल झटका आल्याने त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यांना आयसी यु मध्ये ठेवण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली, माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती,मंत्री, अशी विविध पदे त्यांनी भूषवली, त्यांच्या निधनाने एक कडवट शिवसैनिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,

महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांचं निधन झाल्याची बातमी धक्कादायक आहे. आजची पहाट आम्हा शिवसैनिकांसाठी दुःखद आहे ! माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकासाठी सर नेहमीच मार्गदर्शक म्हणून पाठीशी उभे राहिले, महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आपल्यातून हरपला. मुख्यमंत्री तसेच लोकसभा सभापती म्हणून सरांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे, आम्ही शिवसैनिक ते योगदान कधीही विसरू शकत नाहीत. विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा ‘शिवसेना काल-आज-उद्या’ या पुस्तक रुपात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्य केले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अखेरच्या श्वासा पर्यंत शिवसैनिक म्हणुन जोशी सरांनी आपले कार्य केले, सरांना विनम्र अभिवादन..!

– दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago