नाशिक

धक्कादायक : मनोरूग्ण महिलेसोबत झाले असे काही की …..

आहुर्ली : प्रतिनिधी
हल्ली स्री ही केवळ उपभोगाची वस्तू मानली जाण्याचे व अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. समाजातील ही विक्रुती इतकी फोफावत चालली आहे कि यात चक्क नाते, वय ही पाहिले जात नाही तर आदीचांही यात बळी पडत आहे. असेच एक घ्रुणास्पद कृत्य त्रंबकेश्वर तालुक्यात घडले असून, चक्क मनोरुग्ण महिलेवर अज्ञात लोकांनी अत्याचार करत या महिलेस गर्भवती केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही या महिलेवर अत्याचार होऊन तिने मुलही जन्मास घातले होते. त्यानंतर दुसर्‍यांदा हा प्रकार घडला आहे. याबाबत श्रमजिवी संघटनेचे पदाधिकारी भगवान मधे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे समाज व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
याबाबत मधे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवगाव, ता.त्रंबकेश्वर येथील एक महिला गेल्या कित्येक दिवसापासून वेडसर झालेली असून, निराधार अवस्थेत इकडे तिकडे भटकंती करत असते. या मनोरुग्ण महिलेकडे तिच्या कुटुंबानेही पाठ फिरवली असून, भिक मागून ही मनोरुग्ण महिला जगते आहे. या महिलेच्या वेडेपणाचा फायदा उठवत कुणीतरी अज्ञात एक वा अनेक व्यक्ती या महिलेचे शारिरीक शोषण करत आहेत. त्यातून ही महिला सध्या गर्भवती आहे. यापूर्वी ही सदर महिलेला गर्भधारणा झाली होती. अपत्य प्राप्तीही झाली होती. विशेष म्हणजे सदर महिला अपत्य सांभाळू शकत नाही हे लक्षात घेऊन एका जि.प.शिक्षकाने या अपत्यास दत्तक घेऊन मायेचे छत्र दिले आहे. दुसर्‍यांदा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली असून, या संतापजनक घटनेबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago