संशयिताला अटक; दोन लाखांवर मुद्देमाल ताब्यात
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाच्या शिवारात एका किराणा दुकानातून अवैधरीत्या गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 8 किलो 920 ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून तब्बल 2 लाख 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
बुधवारी (दि.15) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना सौंदाणे येथील इंदिरानगर परिसरातील श्रीगणेशा किराणा दुकानात गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या बातमीनुसार अमली पदार्थ विरोधी श्वान पथकासह पथकाने तत्काळ छापा टाकला. त्यावेळी नीलेश बापू पवार (वय 30, रा. इंदिरानगर, सौंदाणे) हा इसम अवैधरीत्या गांजाची विक्री करताना पोलिसांच्या हाती सापडला.
तपासादरम्यान त्याच्या कब्जातून 8 किलो 920 ग्रॅम गांजा किंमत 1,78,400 रुपये, रोख 10 हजार रुपये, मोबाइल फोन आणि 50 चिलीम असा एकूण 2,00,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, प्रीतम चौधरी, तसेच सपोनि सुदर्शन बोडके, प्रीती सावंजी, तुषार भदाणे, दामोधर काळे, पोलीस अंमलदार विनोद टिळे, सतीश घुटे, आबा पिसाळ, सुधाकर बागूल, प्रशांत पाटील, तसेच श्वान पथकातील अधिकारी उगले, बोरसे, कडाळे, जोपळे आणि श्वान ‘शेरा’ यांनी सहभाग घेतला.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…