नाशिकमध्ये विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

सिडको : प्रतिनिधी
पाथर्डी रोड परिसरातील एका इमारतीत राहणार्‍या अंजली प्रवीण घुगे (वय 31) यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (20 ऑक्टोबर) पहाटे उघडकीस आली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अंजली घुगे या पाथर्डी रोडवरील बी-2, 1203, द मेट्रो झोन इमारतीत पतीसह राहत होत्या. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांचे पती प्रवीण घुगे यांनी त्यांना खाली उतरवून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉ. राठोड यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Married woman dies by hanging in Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *