नाशिक

लासलगाव येथील विवाहितेचा पैशांसाठी छळ

पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; मारहाणीसह घराबाहेर काढले

लासलगाव : प्रतिनिधी
लग्नानंतर माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर काढल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात पती, सासू, नणंद आणि नंदईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रेरणा आशुतोष सोनवणे (वय 24, सध्या रा. गुंजाळवाडी, निफाड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, प्रेरणा यांचा विवाह 14 मे 2025 रोजी आशुतोष ज्ञानेश्वर सोनवणे (रा. सुरेगाव, कोपरगाव) यांच्याशी झाला होता. लग्नात मुलीच्या नातेवाइकांनी 20 लाख रुपये खर्च करून संसारोपयोगी साहित्य आणि दागिने दिले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या लोकांनी “काम आणि स्वयंपाक येत नाही” या कारणावरून प्रेरणा यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. पती आशुतोष हे संभाजीनगर येथे सरकारी रुग्णालयात कार्यरत असून, ते वैवाहिक जबाबदारी पार
पाडत नव्हते.
सासू निर्मला सोनवणे यांनी पतीच्या कर्जफेडीसाठी माहेरून 1 लाख 50 हजार रुपये आणायला लावले, जे नंतर परत केले नाहीत. तसेच लग्नातील दागिने लॉकरमध्ये ठेवून विवाहितेला वापरू दिले नाहीत. संभाजीनगर येथे राहण्यास गेल्यानंतरही पतीने त्रास देणे सुरूच ठेवले. आजारपणात उपचार न करणे, मारहाण करणे असे प्रकार पतीने केले. नणंद तेजश्री लासुरे आणि नंदई भागचंद लासुरे यांनीही पतीची बाजू घेऊन विवाहितेला शिवीगाळ केली. डिसेंबर 2025 मध्ये सासरी झालेल्या बैठकीत पतीने आणखी 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने सर्वांनी मिळून प्रेरणा यांना मारहाण करून
घराबाहेर काढले.
नाशिक येथील महिला दक्षता विभागात झालेले समेटाचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर लासलगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पती आशुतोष, सासू निर्मला, नणंद तेजश्री आणि नंदई भागचंद लासुरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, हवालदार ज्ञानेश्वर जाधव तपास करत आहेत.

Married woman from Lasalgaon harassed for money

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago