नाशिक: प्रतिनिधी
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिकल्याचा जल्लोष साजरा करताना फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजी मुळे कॉलेजरोड वरील बी वाय के कॉलेजच्या परिसरात मोठी आग लागली, या आगीने रौद्ररूप धारण केले आहे, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना बघ्यांची आणि हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांमुळे आढताळे निर्माण झाले होते, पोलिसांनी धाव घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांना हाकलले, या आगीत मोठया प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारत जिकल्याचा आंनद साजरा करण्यात येत असतना फटाके फोडल्याने ठिणगी उडून आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.