नाशिक: प्रतिनिधी
सातपुरच्या कामगार नगर भागात टोळक्याने एका युवकाचा खून केल्या ची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. गंगापूर पोलिसांनी रात्री या भागात शोध घेऊन दोन हल्लेखोर ताब्यात घेतले असून, फरार सांशीयतांचा शोध घेतला जात आहे. अरुण राम बंडी असे या मृत युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचे सांगितले जात आहे. अरुनचे या भागात राहणाऱ्या काही युवकांसोबत जुने वाद होते. तो शनिवारी रात्री कामगार नगर भागत आला असता टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दंगा पथक तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, रात्रीची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.