मनोरंजन

मातृदिनाच्या निमित्ताने ‘मायलेक’ची घोषणा

मातृदिनाचे खास निमित्त साधत सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन हाऊस अंतर्गत ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे.
नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये  आई आणि मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि एक वेगळीच कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबदल निर्माती सोनाली खरे म्हणते, ” मी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे. मातृदिन हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. या खास दिनी माझा पहिला चित्रपट ‘मायलेक’ची घोषणा करणे, हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. लवकरच ‘मायलेक’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील.” या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे.
Bhagwat Udavant

Recent Posts

खासदार साहेब, आम्हाला या जाचातुन मुक्त करा..!

*गाडी बंद रस्ता बंद...? मनमाडला वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त खासदार साहेब आम्हाला या जाचातुन मुक्त…

2 hours ago

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

17 hours ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

17 hours ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

19 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

19 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

19 hours ago