विकासाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम : आडके; संधीचे सोने करून दाखवीन : शिंदे
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत शुक्रवारी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर विलास शिंदे यांची निवड झाली. दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम पार पडताच महापौर हिमगौरी आडके-आहेर व उपमहापौर शिंदे यांनी शहर विकासाचे व्हिजन मांडत संपूर्ण शहरात विकासाची कामे करणार असल्याचे बोलून दाखवले.
महापौर हिमगौरी आडके-आहेर म्हणाल्या, शहराच्या विकासासाठी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम आखण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी व तेथील नागरिकांना बरोबर घेऊन पाहणी करून, तेथील समस्या जाणून घेऊ. कामातून ताकद, निष्ठा व विकास घडवायचा आहे. विरोधी नेत्यांनाही हिच अपेक्षा आहे. प्रभाग निधीबरोबरच शासनाकडून वेगवेगळ्या योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील. कुंभमेळ्यासाठी सर्व जण एकत्रित काम करणार असल्याने नाशिककरांचा यात सहभाग महत्त्वाचा असल्याचे म्हटले. तर उपमहापौर विलास शिंदे म्हणाले, कुंभमेळ्यामुळे शहराची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार असून, या संधीचा उपयोग शहराच्या भविष्याचा मजबूत पाया घालण्यासाठी केला जाईल. या संधीचे नक्कीच सोने करून दाखवीन, कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा जास्तीत जास्त विकास करायचा आहे. पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उपमहापौरपदासाठी दिलेली संधी आपल्यासाठी महत्त्वाची असून, या संधीचे नक्कीच सोने करून दाखवीन, असा विश्वास उपमहापौर शिंदे यांनी व्यक्त केला.
आ. फरांदे, हिरेंकडून नगरसेवकांचे स्वागत
राजीव गांधी भवनमधील मनपा सभागृहाबाहेर आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे सकाळी दहा वाजताच दाखल झाल्या होत्या. त्यांनी सभागृहात येणार्या सर्वच नगरसेवक, नगरसेविकांचे स्वागत केले. सर्वांना आपल्या कामकाजासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी काही नगरसेविक त्यांच्या पायाही पडल्या. तसेच महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांचेही त्यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
Mayor, Deputy Mayor present vision for development
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…