पुणे-मुंबई महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ ‘प्रोपिलीन’ हा अत्यंत ज्वलनशील हायड्रोकार्बन वायू घेऊन जाणारा एक गॅस टँकर उलटला आणि या उलटलेल्या गॅस टँकरने महामार्गावर तब्बल 32 तासांची अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी केली. त्यामुळे सुमारे 25 किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमध्ये अडकलेल्या हजारो लोकांचे 24 तासांहून अधिक काळ अन्नपाण्यावाचून प्रचंड हाल झाले. मुळात धोकादायक रासायनिक पदार्थांच्या गळतीची अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ती कशी हाताळावी याबाबतीत विविध यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आणि संभ्रम दिसून येत होता. कारण ‘या महामार्गावर अपघात झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या महामार्गावर येऊ नये. पर्यायी मार्गाचा वापर करावा’ एवढेही सांगण्याचे सौजन्य संबंधित यंत्रणांनी दाखविले नाही. दुसरीकडे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असली तरी वाहनचालकांकडून टोल वसुली मात्र नित्यनियमाने केली जात होती. खरे तर रस्त्यावरील रासायनिक टँकर हे अनेकदा अतिज्वलनशील, विषारी आणि स्फोटक पदार्थ वाहून नेत असल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठा धोका मानले जातात. त्यामुळे त्यांना ‘धावते बॉम्ब’ असे म्हटले जाते. परदेशात अशा धोकादायक टँकरच्या मागे पायलट आणि रसायनतज्ज्ञ पथक असणे अनिवार्य असते. मात्र, आपल्याकडे सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या बाबतीत सगळाच आनंदी आनंद आहे. ‘धावत्या बॉम्ब’च्या या दुर्घटनेतून संबंधित यंत्रणा काही सकारात्मक धडा घेतील, अशी अपेक्षा
आहे.
-प्रदीप अनुसया शंकर मोरे
Chemical tankers are ‘running bombs’
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…