शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी
मुंबई :
अटीतटीच्या लढतीनंतर पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला अवघ्या फरकाने बहुमत मिळाले आहे. एकूण 118 जागा जिंकत महायुतीने काठावर सत्तास्थापनेसाठी आवश्यक आकडा गाठला. यामध्ये भाजपाने 89 जागा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. निकाल जाहीर होताच आता महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या आणि महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
या संपूर्ण समीकरणात 29 नगरसेवकांसह शिंदेसेना निर्णायक भूमिकेत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चाल टाकण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वीपासूनच मुंबईत भाजपाचाच महापौर होणार, अशी ठाम भूमिका भाजपाकडून मांडली जात होती. मात्र निकालानंतर भाजप बहुमतापासून दूर राहिल्याने सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य ठरला आहे. याच पाश्वर्र्भूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर बसवण्याची परंपरा असल्याचा दाखला देत एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेत सत्तेच्या वाटपात भाजपाने शिंदेसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या मागण्यांमुळे महापौरपदावरून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात मतभेद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही महापौरपदावर दावा केला जात आहे. देवाच्या मनात असेल तर मुंबईत आमचाच महापौर बसेल, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं असून, शिंदे गटातील नगरसेवकांना उद्देशून भावनिक आवाहनंही केली जात आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीभोवती राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. या सार्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाव्य फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे विजयी झालेले सर्व 29 नगरसेवक सुरक्षित ठिकाणी, हॉटेलमध्ये ठेवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी सुरू असलेल्या या राजकीय रस्सीखेचीत पुढील काही दिवसांत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोडेबाजार रोखण्यासाठी हे केले जात आहे. सर्व 29 नगरसेवकांना बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, म्हणजेच त्यांना पुढील तीन दिवस तिथेच राहावे लागेल. यापूर्वी, 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर, अविभाजित शिवसेनेने मनसेच्या सात नगरसेवकांना पक्षांतरित केले होते.
2022 च्या बंडाच्या आठवणीही झाल्या ताज्या
शिंदे गटाच्या हॉटेलमधील मुक्कामामुळे 2022 च्या बंडाच्या आठवणीही ताज्या झाल्या ज्यामुळे शिवसेनेत फूट पडली. मे 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड केले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत उपाध्यक्षांविरुद्ध अविश्वासाची नोटीसही बजावली, ज्यामुळे उपाध्यक्षांना शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापासून रोखले गेले. या संपूर्ण घटनेदरम्यान, 20 जून 2022 रोजी शिवसेनेचे 15 आमदार, 10 अपक्ष आमदारांसह, सुरत आणि नंतर गुवाहाटीला रवाना झाले. 23 जून रोजी शिंदे यांनी दावा केला होता की, त्यांना 35 आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमत चाचणी आणि उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर, 30 जून 2022 रोजी शिंदे मुख्यमंत्री झाले.
उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात
शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. देवाची इच्छा असेल तर मुंबईत आपला महापौर बसू शकतो, असे सूचक वक्तव्य करून सत्तेसाठीची समीकरणे जुळवत असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. असे असताना उद्धव ठाकरे यांचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आमच्यावर संशय घेऊ नका : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुंबईचा महापौर शिवसेना ठाकरे बंधूंचा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झाल्या आहेत. मी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत, असे स्पष्ट करत मी आणि काही नेते आज ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. मला कालच जायचे होते, पण समजले इथे तर कोंडवाडा झाला आहे. मात्र, आमच्यावर संशय घेऊ नका, असे सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि.18) माध्यमांशी बोलताना
केले.
Mayoral election moves gain momentum in Mumbai
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…