आरक्षण सोडतीकडे लक्ष, भाजपांतर्गत लॉबिंग सुरू
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचे मैदान भाजपने पुन्हा मारत तब्बल 72 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे साहजिकच नाशिक महापालिकेचा महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित झाले आहे. दोन-तीन दिवसांत आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षण सुटेल याचे आखाडे बांधत भाजपमध्ये आतापासूनच महापौर पदासाठीचे लॉबिंग सुरू झाले आहे.
सन 2017 मधील महापालिका निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी भाजपचे 66 नगरसेवक निवडून आले होते आणि पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. दुसर्या अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आणि भाजपकडून प्रभाग ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची निवड झाली होती.
यंदा महापौरपदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण लागू होईल, हे ठरल्यावरच भाजपकडून संभाव्य उमेदवाराचे नाव निश्चित होणार असल्याचे समजते. आतापासूनच महापौरपदासाठी लॉबिंग व इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातील संभाव्य उमेदवार वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत आहेत.
पक्षांतर्गत पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगत आहे. महापौरपदाचे आरक्षण मुंबई येथील सोडतीद्वारे ठरविले जाणार आहे. पहिले अडीच वर्ष महापौरपद ओबीसी किंवा एससी महिला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नूतन नगरसेवकांची लवकरच राजपत्रात नोंद
महानगरपालिकेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा राज्य निवडणूक आयोगाकडून निवडून आलेल्या 122 उमेदवारांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत उमेदवाराचे नाव, प्रभाग क्रमांक, आरक्षणाचा प्रकार आणि पक्ष अथवा अपक्ष, अशी सविस्तर माहिती नमूद केली आहे. प्रमाणित यादी मनपाकडून एक ते दोन दिवसांत शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवली जाणार आहे. महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्यामार्फत आवश्यक कागदपत्रांसह हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. नगरविकास विभागाकडून प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची नावे शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. ही प्रसिद्धी म्हणजे निवडून आलेल्या प्रतिनिधींना अधिकृत मान्यता मिळाल्याची अंतिम अधिसूचना असते.
महापौरांची कारकीर्द व आरक्षण
महापौर कालावधी आरक्षण
वसंत गिते 1997-1998 ना.मा.प्र.
अशोक दिवे 1998-1999 अ.जा.
डॉ. शोभा बच्छाव 1999-2002 महिला सा.
दशरथ पाटील 2002-2005 खुला
बाळासाहेब सानप 2005-2007 ना.मा.प्र.
विनायक पांडे 2007-2009 खुला
नयना घोलप 2009-2012 अ.जा.
अॅड. यतीन वाघ 2012-2014 खुला
अशोक मुर्तडक 2014-2017 ना.मा.प्र.
रंजना भानसी 2017-2019 अ.ज.
सतीश कुलकर्णी 2019-2022 खुला
(1992 ते 1997 पर्यंत आरक्षण पद्धत नव्हती.)
The city will get a mayor by the end of January.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik