नाशिक

नाशकात गोवरचा शिरकाव! चार संशयितांचे नमुने तपासणीसाठी मुंबईकडे

नाशिक : प्रतिनिधी
शहरात अखेर गोवर या संसर्गजन्य आजाराचा शिरकाव झाला आहे. एक-दोन दिवसांपूवी शहरात गोवरचे रुग्ण नसल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात असताना, शहरात अचानक गोवरचे चार संशयित बालकांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्याने आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे.
सध्या मुंबई आणि मालेगाव शहरात गोवरची लागण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. विषाणूपासून होणारा हा संसर्ग खोकला किंवा शिंकण्यातून होतो. नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मुलांमध्ये काही लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये, या आजाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्यावी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात केले होते. आरोग्य विभागाने केवळ आवाहनच करत आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी आणि चार ते सहा दिवसांनंतर दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये अ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. गोवरसोबत होणारा न्यूमोनिया हा बर्‍याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये रुग्णाच्या श्‍वसनलिकेला सूज येऊन रुग्णांना श्‍वसन प्रक्रियेत त्रास होण्याची शक्यता असते.
कुपोषित बालकांत सर्वाधिक प्रमाण
कुपोषित बालकांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. गोवर झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. या आजाराचे निदान झाल्यास त्या मुलांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार वेगाने प्रसार करणारा आहे. वेगळ्या खोलीत ठेवावे. भरपूर विश्रांती घ्यायला लावणे. बहुतांशवेळा मुले लहान असल्याने एकट्याला खोलीत ठेवणे शक्य नसते. प्रौढांना या आजाराचा फारसा धोका नसतो. आजारी मुलांना मात्र इतर मुलांबरोबर मिसळू देऊ नये. बालकांना वरीलप्रमाणे काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्या घराजवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लक्षणाबाबत माहिती देऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago