नाशिक

सिन्नर महाविद्यालयात 1 ऑगस्टला मेगा जॉब फेअर

♦ 600 हून अधिक रोजगार संधी

♦ 70 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग

♦ निवडलेल्या उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्र

अशी करा तयारी

उमेदवारांनी बायोडाटा, आधारकार्ड किंवा पॅनकार्ड, बारावीची गुणपत्रिका, अंतिम पदवी किंवा डिप्लोमाची गुणपत्रिका तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा. ज्या कंपन्यांमध्ये मुलाखत द्यायची आहे त्यानुसार आवश्यक कागदपत्रांच्या प्रती व बायोडाट्याचे संच तयार ठेवावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सिन्नर : प्रतिनिधी
तालुका आणि जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, सिन्नर येथे 1 ऑगस्ट रोजी भव्य जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, नाशिक आणि सीआयआय-मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या या मेळाव्यात 70 हून अधिक आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार असून, 600 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती मविप्रचे तालुका संचालक कृष्णाजी भगत, सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनी दिली.
गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे शनिवारी (1 ऑगस्ट) सकाळी 9.30 वाजल्यापासून मेळाव्याला सुरुवात होणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.
एकाच ठिकाणी अनेक कंपन्यांच्या मुलाखती देण्याची संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहे. पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, 7, 15 आणि 90 दिवसांच्या कालावधीतील उच्च तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रशिक्षणही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. मेळाव्याच्या आयोजनासाठी तालुका संचालक कृष्णाजी भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, तसेच समन्वयक एचआर कमलेश गोसावी, एचआर सतीश पवार आणि एचआर अनिकेत निकुम हे विशेष परिश्रम घेत आहेत.

 

Mega Job Fair at Sinnar College on August 1st

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago