साहित्याला कटूता न बाळगता दाद द्या : प्रदीप निफाडकर
नाशिक : प्रतिनिधी
साहित्यिकांनी एकमेकांच्या लेखनाविषयी ,साहित्याविषयी कोणत्याही प्रकारची कटूता मनात न ठेवता दाद द्या असे प्रतिपादन गझलकार आणि कविता संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी केले.
जिल्हा 53 व्या साहित्यिक मेळावा काल (दि.1) शनिवार रोजी मु.श.औरंगाबाद सभागृहात पार पडला.
मेळाव्याचे उद्घाटन संजय वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी साहित्य मेळाव्याच्या अध्यक्ष वंदना अत्रे , उद्घाटक संजय वाघ ,सावाना अध्यक्ष दिलीफ फडके ,सुनिल कुटे,धर्माजी बोडके ,वैद्य विक्रांत जाधव,गिरीश नातू , जयप्रकाश जातेगावकर,शंकर बोऱ्हाडे आदि मान्यवर उपस्थित होते .
निफाडकर म्हणाले ,नाशिकला साहित्यिकांची मोठा वारसा आहे. मराठी भाषेला समृध्द परंपरा आहे. मराठी भाषेने इतर भाषेतून अनेक गोष्टी घेत समृद्ध वाटचाल केली. मराठी भाषेत 89 कविता प्रकार आहेत. एवढे कविता प्रकार कोणत्याच भाषेत आढळणार नाहीत. इतर भाषेतले कवितेचे प्रकार घेऊन आपण आपल्या कविता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.
कवितेच्या विविध प्रकाराविषयी कार्यशाळा घ्यायला हवी त्यातून नवीन साहित्यिकांना मार्गदर्शन मिळेल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
संजय वाघ म्हणाले,
सावाना महाराष्ट्रासाठी भूषणावह संस्था आहे. सावानाची ग्रंथसंपदा पावने दोन लाख आहे.
समाजाला दिशा दर्शविण्यात काम साहित्यिक करतात..
समाजासाठी जे योग्य आहे,ते आपल्या लेखनातून मांडण्यात काम लेखकांनी कराव.ज्वलंत विषयावर असलेले वास्तववादी साहित्य वाचकांना आवडत.
साहित्य समाजाचा आरसा असते.
काळानुरूप प्रत्येक गोष्टीच मार्केटिंग करण्यास महत्त्व आल आहे. मार्केटिंग आणि पुरस्कारात रमण्याऐवजी साहित्यात योगदान द्याव.
लहान मुलांच भावविश्व बदलल आहे. त्यामुळे बालसाहित्य लेखन करताना आजच्या मुलांच्या भावविश्वाचा विचार करायला हवा. लहान मुल
मराठी बोलताना आणि लिहताना मुल कमी पडतात. त्यासाठी पालकांनी आणि मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करायला हवेत.
वंदना अत्रे म्हणाल्या,
गझलला इश्क आणि मदीरातून बाहेर काढण्याचे काम ..गझलकार प्रदीप निफाडकर यांनी केले तर . लहान लेकरांच्या एकाकीपणाची काळजी घेत त्यांचा एकाकीपणा घालवण्यासाठी संजय वाघ यांनी आपल्या बाल साहित्यातून प्रयत्न केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दिलीप फडके यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर पार पडलेल्या 53 व्या जिल्हा साहित्य मेळाव्याला साहित्यिकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे प्रस्तावित संजय करंजकर यांनी केले. तर आभार गणेश बर्वे यांनी मानले .
कवि संमेलन रंगले
कोरोनाच्या प्रादुर्भावनंतर दोन वर्षानी भरलेल्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याला साहित्यिकांनी गर्दी केली होती. यावेळी रंगलेल्या कवि संमेलनात साहित्यिकांनी विविध कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…