उत्तर महाराष्ट्र

मासिकपाळी आल्याने विद्यार्थिंनीला वृक्षारोपणापासून रोखले

त्र्यंबक तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेतील गंभीर प्रकार
नाशिक : प्रतिनिधी
मासिक पाळी आलेल्या एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करू नको, असे एका शिक्षकानेे सांगितले. य विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखल्याच्या या घटनेमुळे समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. ही घटना त्र्यबंकेश्‍वर तालुक्यातील देवगाव आश्रम शाळेत घडली. मात्र, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांनी असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. तर राज्य महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय कन्या आश्रम शाळेत पावसाळा असल्याने आश्रमाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विद्यार्थिंनीला शिक्षकांनी वृक्षरोपण करण्यापासून थांबवले. तसेच तुझी पाळी सुरू आहे, तू झाड लावलेस, तर ते झाड मरेल असे सांगून विदयार्थिंनीला वृक्षारोपण करू दिले नाही. या प्रकारानंतर विद्यार्थिंनीने शाळेत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. यानंतर पीडित मुलीनेे आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर संबंधीत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत.
दुसर्‍या बाजूला या प्रकरणाची शिक्षण विस्तार अधिकार्‍यांनी चौकशी करत दिलेल्या अहवालात असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रकल्पधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना या स्वत: संबंधित मुलींशी आज (दि.27) भेटून चर्चा करणार आहेत.
या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतली आहे. तसेच संबंधित विभागाने प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असे नमूद केले.

Bhagwat Udavant

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

7 hours ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

1 day ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

2 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

2 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

2 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

3 days ago