दिक्षी शिवारात गोवंशाचा टेम्पो पकडला

दिक्षी शिवारात गोवंशाचा टेम्पो पकडला

दिक्षी  प्रतिनिधी: ११ जुलै रोजी कसबे सुकेणे दिक्षी ओझर रस्त्यावर दिक्षी गावाजवळ रात्रीच्या वेळी हिंदुंच्या पवित्र एकादशीच्या दिवशीच कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडला व गाईची सुटका झाली ही घटना ताजी असतांनाच काल मंगळवारी रात्री साडेनऊ या सुमारास भरधाव वेगाने जाणारा टेम्पो दिक्षी जिव्हाळे शिवावर पलटी झाला आजुबाजूच्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली व मदतीसाठी टेम्पो जवळ जाताच त्यात एक गाय व तीन बैल आढळले तेव्हा जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले .नागरिक जमा होताच गाडीतील ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेत पळून गेला तर रवींद्र धुमाळ हा नागरिकांच्या तावडीत सापडला
थोडक्यात हकीकत अशी की रविंद्र सुरेश धुमाळ वय २५ रहाणार जळगांव फाटा ता निफाड हा अकबर बाबु शेख रा ओझर याचे सांगणेवरून निफाड कडून
पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपणीच्या पिकअप क्र.एम एच १५ बी जे ११६० हीचेत ०४ गोवंश जातीची जनावरे आखडलेल्या अवस्थेत त्यांची तोंडे दोरांच्या सहाय्याने करतेने यांधुन निर्दयतेने दाटीवाटीने कोंबुन त्याचेसोबत असलेला इसम नामे अकबर बाबु शेख याचे सांगणेवरून कत्तलीच्या इराद्याने भरधाव वेगात कसबे सुकेणे ते ओझर रोडने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन वेदारकारपणे चालवून वाहतुक करुन घेवून जात असतांना पिकअप नादुरुस्त होवुन पिकअप चालकाचा पिकअप वरील ताबा सुटून ती रोडच्या कडेला पलटी झाली व पेटली यात टेम्पोची कॅबीन जळाली अपघातात पिकअप चालकालही किरकोळ जखमी झाला नागरिकांनी अनेक वेळा फोन करूनही पोलीसांनी लवकर प्रतिसाद दिला नाही नागरिकांनी गाईना सुखरूप बाहेर काढले बऱ्याच वेळानंतर अपघात स्थळी, आर.एस घुमरे, अनुपम जाधव, डी एल. वाघेरे, यांनी भेट देऊन पंचनामा केला स्वताचे जबर दुखापतीस कारणीभुत होवुन गोवंश जनावरांचे किरकोळ दुखापतीस व पिकअपचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून रविंद्र धुमाळ यास पंचनामा करून ताब्यात घेतले व एक गाय किंमत वीस हजार .तीन बैल किंमत साठ हजार, व महिंद्रा कंपणीची टेम्पो क्र एम एच १५ बी जे ११६० किंमत अडीच लाख रुपये असा माल जप्त करुन प्राणी संरक्षण अधिनियम कायदयाखाली गुन्हा दाखल करण्यात आला

ओझर पोलिस वेळेवर का पोहचत नाही …नागरिकांचा प्रश्न

घटना घडल्यानंतर जमलेल्या नागरिकांनि घटना घडल्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला दिली परंतु अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर घटनास्थळी पोहचण्यासाठी पोलिसांना तबल दीड तास लागला तो पर्यँत घटनेचे माहिती आजपासच्या सर्व गावांना माहीत झाली घटनास्थळी मोठी गर्दी झाली. शेवटी पोलिस कॉंटोल फोन करावा लागला.ओझर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेहमीच कत्तलीसाठी जाणारे जनावरे सापडतात यातून पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्न निर्माण होते

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago