नाशिकमध्ये म्हाडाची लॉटरी
नाशिक प्रतिनिधी
नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी वाट पाहणाऱ्या नाशिककरांना आता म्हाडा एक संधी देत आहे. याबाबत खुद्द राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माहिती दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, नाशिकमध्ये 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असे माझ्या लक्षात येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत 2031 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.नाशिकमध्ये जवळ जवळ 5000 घरे मिळतील असा अंदाज आहे. माझे गाव असल्या कारणाने मी स्वतः तिथे येऊन लॉटरी काढणार आहे. घोटाळा होता हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…