नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET 2022) ऑगस्ट २०२२ मध्ये होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सामंत यांनी सोशल मिडीया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे.जेईई मेन (JEE Main) आणि नीट (NEET) परीक्षांमुळे राज्यातील सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.
सीईटी परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी कळवले आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा जून आणि जुलै महिन्यात होणार आहेत. जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र २९ जून तर दुसरे सत्र ३० जुलै २०२२ रोजी संपणार आहे तर नीट परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे, जेणेकरून या परीक्षा एकमेकांशी क्लॅश होणार नाहीत.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते.
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…