नाशिक : प्रतिनिधी
जगभरातील विविध देशांच्या खास पाककृतींचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली. इटलीतील बोम्बोलोनी.., लेबनॉनमधील मिनी पिटा पॉकेट्स.., नेपाळचे स्वादिष्ट मोमोस… आणि अमेरिकेतील दही चीज केक… अशा आकर्षक व चविष्ट पदार्थांची मेजवानी ‘मायक्रो मंच फूड फेस्टिव्हल’च्या माध्यमातून सादर करण्यात आली. मविप्र संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.
केटीएचएम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘मायक्रो मंच फेस्ट 2026 द अॅन्युअल सेलिब्रेशन ऑफ लिव्हिंग कल्चर अक्रॉस द ग्लोब’ हा विद्यार्थिभमुख उपक्रम राबविण्यात आला. ‘अन्नाच्या सकसपणाचे शास्त्र व त्याचा मानवी शरीराला होणारा उपयोग व सत्वहीन पदार्थांचे दुष्परिणाम’ यांचा अभ्यास असलेल्या ‘मम्मा मिल्स’ कंपनीच्या संचालिका स्मिता महाजन यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी जगभरातील वेगवेगळे सूक्ष्मजीवांपासून बनविलेल्या पदार्थांचे प्रदर्शन आणि सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे होत्या. याप्रसंगी मविप्रचे संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी स्टॉल्सना भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाककृतींचा आस्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागप्रमुख डॉ. सुनीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. स्नेहल शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रा. वैशाली टिळे, प्रा. डॉ. अविनाश काळे, प्रा. प्राजक्ता पाचोरकर, प्रा. अमृता जाधव, प्रा. जयश्री बोरसे, प्रा. केतकी क्षीरसागर, प्रा. ऋतुजा पाटील व विभागाचे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
‘Micro Manch Food Festival’ initiative at KTHM College
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…