हंगामातील सर्वांत कमी नोंद
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये थंडीने जोरदार हजेरी लावली असून, बुधवारी सकाळी किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. हे तापमान चालू हंगामातील आतापर्यंतचे सर्वांत कमी ठरले आहे. मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका सातत्याने वाढत असून, शहरातील वातावरण पूर्णपणे गारठले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर दिशेकडून येणार्या थंड वार्यांचा पुरवठा वाढल्यामुळे रात्रीचे तापमान झपाट्याने घसरले आहे. दिवसभर उन्हाची हलकी उपस्थिती असली, तरी पहाटे आणि सायंकाळी गारवा कायम आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी कमाल तापमान 28.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिवस-रात्रीच्या तापमानातील मोठ्या फरकामुळे गारठ्याची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. नागरिकांनी उबदार कपडे, स्वेटर, मफलर, टोपी यांचा वापर वाढवला आहे.
सकाळच्या वेळी रस्त्यांवर गर्दी तुलनेने कमी दिसत असून, गरम पेयांचे सेवन वाढले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनी या अचानक वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच दमा-अस्थमा व सर्दी-खोकला असणार्यांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. थंड वारे आणि कोरडे हवामान यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत नाशिकमध्ये गारठा आणखी वाढणार असून, थंडीचा कडाका तसाच कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…