मंत्री भुजबळ यांच्या ट्वीटने महायुतीत मिठाचा खडासमीर भुजबळ यांचे नांदगावमधून लढण्याचे संकेत  

मंत्री भुजबळ यांच्या ट्वीटने महायुतीत मिठाचा खडा

समीर भुजबळ यांचे नांदगावमधून लढण्याचे संकेत
मनमाड : आमिन शेख

पंकज भुजबळ हे गेली १० वर्षे नांदगाव मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते..येवल्यात मंत्री छगन भुजबळ आहेत तसेच नांदगावात पण अनेक कार्यकर्ते आमच्या मागे उभे आहेत..नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बेस आहे..सगळ्यांची इच्छा आहे, युतीकडून आम्ही उमेदवारी करावी..पंकज किंवा मी आम्ही पक्षापुढे आमची भूमिका मांडू पक्ष काय तो निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिकच्या मनमाड येथे दिली कॅबिनेट मंत्री भुजबळ यांच्या ट्विटनंतर समीर भुजबळ हे नांदगाव मधून उमेदवारी करणार या चर्चेने जोर धरला आहे महायुतीकडूनच आम्ही मागणी करणार आहे ही जागा शिवसेनेकडे असेल पण आम्ही मागायचे काम करणार महायुतीचे तिकिट न मिळाल्यास स्वतंत्र निर्णय घेणार का ? याबाबत मात्र समीर भुजबळ यांनी बोलणे टाळले.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे महायुतीकडून निवडणूक लढणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती आज समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काका मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना शुभेच्छा देताना एक्स अकाउंटवरून मनमाड व नांदगावच्या विकासासाठी तुला दीर्घायुष्य लाभो असे ट्विट केले यावरून समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे इच्छुक उमेदवार असल्याचे आज जाहीर झाले याबाबत आज समीर भुजबळ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी देखील नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी दुजोरा दिला यावेळी त्यांना ही जागा विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यामार्फत शिवसेनेकडे आहे तसे खुद्द पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील प्रसार माध्यमांना सांगितले यावर बोलताना समीर भुजबळ म्हणाले की आम्ही देखील महायुतीचा एक घटक पक्ष आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेली दहा वर्षे येथे विधानसभेचे नेतृत्व केले आहे पंकज भुजबळ तत्कालीन आमदार होते व त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत आम्ही देखील पक्षाचा अजेंडा घेऊन समोर जाऊ महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही देखील या जागेवर दावा करणार आहे याबाबत आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे स्पष्ट मत माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केले गेल्या दोन महिन्यापासून भुजबळ कुटुंबीयांतर्फे नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात अनेकांच्या भेटी गाठी घेऊन तसेच विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती देऊन आगामी विधानसभेची तयारी सुरू आहे समीर भुजबळ हे स्वतः गणेशोत्सव काळात ईद-ए-मिलाद तसेच नवरात्र उत्सव कार्यक्रमात भेट देऊन नागरिकांशी चर्चा करत आहे यासह मनमाड नांदगाव शहरात गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आली त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील नांदगाव मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले

नांदगाव विधानसभेत महायुतीतर्फे कांदे की भुजबळ…?
राज्यातील हेवीवेट नेते म्हणून प्रसिद्ध असलेले मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक जिल्ह्यात वर्चस्व आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असताना देखील त्यांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणला होता यामुळे भुजबळ यांचे राज्यात व केंद्रात वजन आहे सध्या महायुतीच्या माध्यमातून भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्वास कांदे हे आमदार आहेत मात्र भुजबळ यांच्यातर्फे देखील या मतदारसंघावर दावा करण्यात येत असून आगामी विधानसभेत नांदगाव विधानसभेची उमेदवारी सुहास कांदे की समीर भुजबळ यापैकी कोणाला मिळेल याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

म्हसरूळ येथून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

सिडको : विशेष प्रतिनिधी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत म्हसरूळ-आडगाव…

2 minutes ago

स्वामी समर्थनगरात अल्टो कारवर हल्ला

अज्ञात टवाळखोरांकडून तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट…

14 minutes ago

10 गुन्हे उघडकीस, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

गंगापूर पोलिसांची कारवाई सिडको : विशेष प्रतिनिधी गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी…

22 minutes ago

जिल्हाभरात 44 हजार 216 साड्यांचे वाटप

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साडी…

37 minutes ago

नाशिकमध्ये पुन्हा खून; या भागात घडली घटना

सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…

4 hours ago

पाऊस, वादळामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…

22 hours ago