नाशिक

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधीचा गैरव्यवहार

माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचा आरोप

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी केला.
शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सनसनाटीत आरोप केले. हा केवळ आर्थिक अपहार नव्हे, तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर झालेला आघात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि नाशिक जिल्हा न्यायालयाच्या संबंधित अधिकार्‍यांकडे निवेदन पाठवून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिंदे यांनी हे संपूर्ण प्रकरण त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पवित्रतेला आणि आस्थेला धक्का पोहोचवणारे असल्याचे म्हटले. ललिता शिंदे यांनी केलेल्या आरोपांनुसार धर्मदाय सहआयुक्त (नाशिक) व तत्कालीन अध्यक्षांसह विश्वस्तांनी मिळून या नियुक्त्यांसाठी अवैध आर्थिक देवाणघेवाण केल्याचे आरोप केले आहेत. संबंधित न्यायाधीश आर.आर. राठी यांच्यावर 11 एप्रिल 2025 रोजी पदमुक्तीची कारवाई झाली असून, त्यांच्या संदर्भातील चौकशी सुरू आहे. शिंदे यांनी यामध्ये सीडीआर तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निर्णय प्रक्रियेचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी पत्रकार परिषदेत निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago