नाशिक

शहरातील 22 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे

शहरातील 22 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे

सिडको : विशेष प्रतिनिधी
शरणपूर रोड येथील जुने नाशिक पोलीस आयुक्तालयाची जागा बळकावण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी 22 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकच्या शरणपूर गावठाण परिसरात जुने पोलीस आयुक्त कार्यालय आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही जागा नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन म्हणेजच एनडीटीएच्या मालकीची आहे. मात्र, नाशिक डायोसेशन काउन्सिल म्हणजेच एनडीसी ही कंपनी स्थापन करून या जमिनीवर हक्क सांगण्यात येऊन नामसार्धम्याच्या आधारे ही जमीन बिल्डरांना विकण्याचा प्रयत्न झाला. भूमी अभिलेख कार्यालयाच्या अहवालामुळे हा घोटाळा उघडकीला आला. याप्रकरणी एनडीसीच्या 15 जणांवर, तर 22 बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तीनशे कोटींची ही जमीन 1 कोटी 80 लाखांना लाटण्याचा कट होता. मात्र, 1945 आणि 54 च्या खरेदी-विक्री रेकॉर्डनुसार ही जागा केवळ एनडीटीए म्हणजेच नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशनची असल्याचे समोर आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आडगावचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंकज मालपुरे, पिंकेश शहा, प्रवीण उनवणे, माधुरी पाटील, कविता पाटील, राजेंद्र शहा, शशिका शहा, श्रेणीक शहा, सिरीन शहा, रजनी खैरनार, वल्लभदास ठक्कर, वैभव पाटील, किरण पक्ष, गौरव ठक्कर, भक्ती भाव हॉर्टिकल प्रा. लि., दिपशिका फार्मस प्रा. लि., कर्मभूमी फार्मस प्रा. लि., निर्माण आश्रय डेव्हलपमेंट, नवरत्न लँड्स अँड इस्टेट प्रा. लि., हरियाली अ‍ॅग्रीकल्चर्स प्रा. लि., ठक्कर डेव्हलपर्स लि. यांच्यासह एकूण 30 हून अधिक व्यक्ती व संस्था आरोपी म्हणून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे .
फसवणूक, अपहार आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची मालमत्ता बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आणखी काही मोठी नावे या प्रकरणात पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Editorial Team

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago