नाशिक: प्रतिनिधी
सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मधून सुरेश पाटील भाजप, हिमगौरी आडके भाजप, स्वाती भामरे भाजपअजय बोरस्ते शिवसेना हे विजयी झाले. या प्रभागात आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश मुन्ना हिरे यांचा पराभव झाला. त्यामुळे आमदार हिरे याना धक्का बसलानाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये मतदारांनी कौल देत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या प्रभागात भारतीय जनता पक्षाने तीन जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर शिवसेनेने एका जागेवर यश मिळवले.
भाजपचे सुरेश पाटील यांनी १०,६९५ मते मिळवत प्रतिस्पर्धी राजेंद्र सूर्यवंशी (८,२७९ मते) यांचा पराभव केला. महिलांच्या जागेत भाजपच्या हिमगौरी आडके यांनी ११,१८४ मते मिळवत शिवसेनेच्या रोहिणी शिरसाठ (९,९९२ मते) यांच्यावर मात केली.
तिसऱ्या जागेवर भाजपच्या स्वाती भामरे यांनी ११,७४० मते मिळवून शिवसेनेच्या वंदना रकिबे (७,०६२ मते) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
दरम्यान, शिवसेनेला प्रभागात दिलासा देणारा विजय अजय बोरस्ते यांनी मिळवला. त्यांनी १३,०२२ मते घेत भाजपच्या योगेश हिरे (६,९२० मते) यांचा पराभव करत शिवसेनेची एकमेव जागा कायम राखली.
प्रभाग क्रमांक ७ मधील या निकालातून मतदारांचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसून आला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…