‘एमएनजीएल’ची मुजोरी कायम

मंत्री महाजनांच्या तंबीनंतरही पुन्हा बैठकीकडे पाठ

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची चाळण झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यावरून नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सलग बैठकांना ‘एमएनजीएल’च्या अधिकार्‍यांनी दांडी मारल्यामुळे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला होता. दरम्यान, गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांना सोमवारी मनपा आयुक्तांनी बोलावले होते. परंतु, गॅस कपंनीची मुजोरी कायम असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. कंपनी अधिकार्‍यांनी पुन्हा पाठ फिरवली आहे.
‘एमएनजीएल’च्या या मनमानी कारभाराची आणि गैरहजेरीची गंभीर दखल घेत नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी तातडीने कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी फोनवर संपर्क साधला. शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती, खोदकामाचा आढावा आणि समन्वयातील त्रुटींसंदर्भात त्यांनी अधिकार्‍यांना विचारणा केली. तसेच पुढील आठवड्यात होणार्‍या बैठकीला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहून प्रत्यक्ष अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्त खत्री यांनी केली.
दरम्यान, शहरातील रस्त्यांवर पडलेले धोकादायक खड्डे आणि पाइपलाइनच्या खोदकामामुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर थेट संपर्क साधत खरडपट्टी केली होती सोमवारी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनीच संपर्क साधून या अधिकार्‍यांना पुढील बैठकीबाबत सूचना दिल्या. या आधी मंत्र्यांच्या निर्देशानंतरही सोमवारी कंपनीचे अधिकारी फिरकलेच नाहीत. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएनजीएलकडून कोणताही संपर्क न झाल्याने अखेर महापालिकेनेच पुढाकार घेऊन कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला.

‘एमएनजीएल’चा प्रमुख भाजपाचा पदाधिकारी
गॅस लाइनसाठी संपूर्ण शहर एमएनजीएलकडून खोदून ठेवले आहे. याचा सध्या नाशिककरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. भाजपच्या कारकिर्दीत होत असलेल्या गॅसच्या कामात खूपच विलंब होत आहे.दरम्यान, एमएनजीएल कंपनीचा प्रमुख भाजपचा पदाधिकारी असून, एका मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्याला नाशिकच्या कामाचे कंत्राट देण्यात आल्याची चर्चा भाजपातच होत आहे. परंतु, संपूर्ण शहर खोदून ठेवल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना भाजप पदाधिकारी, नगरसेवकांना करावा लागतोय.

MNGL’s high-handedness continues.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *