मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

 


नाशिज: प्रतिनिधी  भोंग्याविरोधी आंदोलनामुळे   वातावरण चांगलेच तापले असून भद्रकाली परिसरात अजान सुरू होताच हनुमान चाळीस लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सातपूरला सहा ते सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस रस्त्यावर उतरले असल्याने मनसे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत.

 

भद्रकाली परिसरात झालेल्या आंदोलनात महिला पदाधिकार्यांचा समवेश  होता. सकाळच्या आजानवेळी काही ठिकाणी भोंग्याविना अजान झाली. पहाटेपासूनच शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील विविध मशिदी, मंदिर सह संवेदनशील भागामध्ये पोलिसांचा पहाटेपासून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भद्रकाली परिसरात माजी नगरसेवक सुजता ढेरे सह मनसेच्या महिलांनी दूध बाजार परिसरात मशिदी समोर श्रीरामाच्या घोषणा दिल्या यानंतर सदर महिलांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे सातपूर मध्ये एका मंदिरांमध्ये पुण्यातील सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरात पहाटे चार पासूनच पोलिसच बंदोबस्त तैनात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *