तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.त्यांच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हार्दिकच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायच झाल तर हार्दिक हा झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव या मालिकेत काम करत आहे.