नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी
पहलगाम (जम्मू-काश्मीर) घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला उधळून लावण्याचे मॉकड्रिल घेण्यात आले. रेल्वे स्थानकातील जुना मुसाफिर खाना व फलाट क्रमांक एकवर हे प्रात्यक्षिक झाले. मुसाफिर खाना निंबस येथे एक बेवारस बॅग आढळल्याची माहिती प्रवाशाने रेल्वे अधिका-यांना कळवली. त्यांनी तत्काळ रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाला तेथे जाण्याचे आदेश दिले. पोलिस व जवानांना बॅगमध्ये पांढरा मोठा सेल, काळ्या रंगाचे डेटोनेटर, दोन वायर अशी बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. खबरदारी म्हणून परिसर निमर्नुष्य
करण्यात आला.
ठाणे अंमलदारांनी नाशिक रोड शहर पोलीस कंट्रोेल रूम येथे माहिती दिली. बॉम्बशोध व निकामी पथक, जलद प्रतिसाद पथक, दहशतवादविरोधी पथकाला पाठविण्याची विनंती केली. नाशिक रोड अग्निशमन दल, नाशिक रोड पोलीस ठाणे, बिटको रुग्णालय येथे संपर्क करून तत्काळ मदत मागविण्यात आली. हा सर्व फौजफाटा रुग्णवाहिका व साहित्यासह दाखल झाला. बॉम्बशोध पथकाने श्वान अल्फा याच्या मदतीने बॅग तपासली असता, त्यात स्फोटके आढळली. त्यांनी योग्यरीत्या हाताळणी करून बॉम्बसदृश्य वस्तू नष्ट केली. ही बॅग ठेवणार्याचा रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने शोध घेतला. तेव्हा एक संशयित व्यक्ती भुसावळला जाणार्या लिफ्टच्या बाजूला बसल्याचे दिसले. जलद प्रतिसाद पथकाने तिकडे धाव घेतली. तेव्हा त्याच्या हातात रिमोट कंट्रोल दिसला. माझ्याजवळ येऊ नका, मी सर्वांना उडवून टाकेन व स्वतः मरेन, अशी धमकी त्याने दिली. जलद प्रतिसाद पथकाने त्यास गोळ्या घालून ठार केले. या प्रात्यक्षिकात बॉम्बशोध उपनिरीक्षक राणे व सहा पोलिस तसेच पोलिस निरीक्षक कदम व त्यांचे सहा सहकारी, नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पाच पोलिस, अग्निशमन दल केंद्रप्रमुख जाधव, लीडिंग फायरमन आर. डी. सोनवणे व चार कर्मचारी, बिटको रुग्णालयातील डॉ. स्वप्नील पाटील व पाच सहकारी, रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी, जलद प्रतिसाद पथकाचे उपनिरीक्षक चव्हाण व आठ कमांडो, दहशतवादविरोधी पथकातील उपनिरीक्षक हसन सय्यद, पोलिस रवींद्र महाले, प्रगती जाधव, नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रताप सिंह व बारा जवान, रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बनकर व दहा पोलीस आदींनी सहभाग घेतला होता.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…