नाशिक

जिल्हास्तरीय यंत्रणा सतर्क; रामकुंडावर मॉकड्रिल

नाशिक : प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पाश्वर्र्भूमीवर हल्ला झाल्यास कशी काळजी घ्यावी, याची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी पंचवटी नागरी संरक्षण दलातर्फे शुक्रवारी (दि. 9) रामकुंड परिसरात मॉकड्रिल झाले. शत्रूच्या विमानांकडून बॉम्बहल्ला झाल्यास नागरिकांनी काय दक्षता घ्यावी, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दल, महापालिका अग्निशमन दलातर्फे आखण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान मॉकड्रिल घेण्यात आले.
मॉकड्रिलदरम्यान शत्रुराष्ट्राची लढाऊ विमाने येत असल्याची खबर मिळताच सायरन वाजू लागला. रामकुंड परिसरात बॉम्ब पडताच नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुरक्षेसाठी पालथे झोपून नागरिकांनी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. शत्रुराष्ट्राकडून रामकुंड परिसरात बॉम्बहल्ला झाल्याची खबर मिळताच नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल तीन मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. बॉम्बहल्ल्यातील जखमींना त्वरित फर्स्टएड पोर्टपर्यंत पोहोचविण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेने त्यांना रुग्णालयात नेले. यावेळी ठिकठिकाणी लागलेल्या आगी अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे
मारून विझवल्या.
भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र शासनाच्या
निर्देशानुसार संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मॉकड्रिल घेण्यात आले. भद्रकाली, देवळाली, सातपूर, अंबड, ओझर, नाशिकरोड, सरकारवाडा आदी ठिकाणी मॉकड्रिल झाले.

मॉकड्रिल पाहण्यासाठी गर्दी

नाशिक शहर धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने येथे कायम पर्यटकांची गर्दी असते. उन्हाळा असल्याने पर्यटकांची गर्दी अधिक वाढली आहे. रामकुंडावर प्रशासनाकडून मॉकड्रिल होत आहे, हे माहीत नसल्याने काही पर्यटक घाबरले होते. मात्र, नंतर जेव्हा लक्षात आले की, मॉकड्रिल करण्यात येत आहे. यावेळी पर्यटकांनी मॉकड्रिल पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Gavkari Admin

Recent Posts

पावसाळ्यात केसांची निगा

पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…

14 hours ago

आषाढी एकादशी उपवासाचे पूर्ण ताट

वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्‍याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…

14 hours ago

किचन ते कॉन्फरन्स रूम

भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…

14 hours ago

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…

15 hours ago

कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…

16 hours ago

धोकादायक यशवंत मंडईवर हातोडा

मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…

16 hours ago