नाशिक : वार्ताहर
एटीएम क कार्ड आदला-बदली करून फसवणुक करणार्या संशयितास भद्रकाली पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि 3) दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास द्वारका, नाशिक येथील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये अनोळखी इसम (वय अंदाजे 40) याने फिर्यादीच्या एटीएम कार्डचे नवीन पिनकोड जनरेट करण्यास मदत करतो असे सांगुन फिर्यादी यांची नजर चुकवून त्यांच्या कार्डची अदला बदली करून फिर्यादी याचे बँक खात्यातील 23 हजार 100 रूपये काढून घेतले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपीताचा तात्काळ शोध घेवुन त्यास अटक करणेबाबत पोलीस आयुक्त. जयंत नाईकनवरे, उपायुक्त परिमंडळ 1 अमोल तांबे, सहायुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते व यांच्या पथकाने घटनास्थळावरील सी. सी. टी. व्ही. फुटेजची तपावणी केली.संशयित वरिंदर बिलबहादुर कौशल (वय 42 वर्षे रा. जेलरोड, नाशिकरोड) यास ताब्यात घेत ..चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास या गुन्हयात अटक करण्यात आली असुन न्यायालयाने 8 जून 22 रोजी पर्यत पोलीस कोठडी दिली. गुन्हयातील अपहार केलेली 23 हजार 100 रक्कम त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर मोहिते हे करत आहेत.