‘बहारो फुल बरसाओ’ची क्रेझ कायम

नाशिक : अश्‍विनी पांडे
लग्नसोहळ्याचे स्वरूप काळानुरूप बदलले. पूर्वीच्या काळी साधेपणाने होत असलेले विवाह आता मोठ्या धुमधडाक्यात होत आहेत. काळानुरूप बदल होणे स्वाभाविक आहे. पूर्वी लग्नाची वरात बॅण्डबाजाने पूर्ण होत होती. आता मात्र बॅण्डबाजासोबत डीजेही लावण्यात येतो. असे असले तरी एक गोष्ट मात्र तशीच आहे, ती म्हणजे लग्नात नवरी, नवरदेवाच्या आगमनाला लावण्यात येणारी गाण्याची धून.
‘बहारो फुल बरसाओ’ ही धून वर्षानुवर्षे लग्नात वाजविण्यात येते. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज चित्रपटाला आता 56 वर्षे झाले. या चित्रपटातील ‘बहारो फुल बरसाओ’ हे गाणे राजेंद्र कुमार आणि वैजयंती माला यांच्यावर चित्रित झाले आहे. तर या गाण्याचे गीतकार हसरत जयपुरी आहेत. तर शंकर जयकिशन यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. मोहम्मद रफी यांच्या बहारदार आवाजाने गाणे स्वरबद्ध झाले आहे.
हे गाणे आजही लोकप्रिय आहे. लोकप्रिय नसून, प्रत्येक लग्नात वधू-वरांचे विवाहस्थळी आगमन याच धूनने होते. ‘बहारो फुल बरसाओ’ या अजरामर गाण्याने प्रत्येकाच्या आयुष्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक चित्रपटांत विवाह प्रसंगावर गाणे चित्रित झाले आहे. ती गाणी त्या त्या वर्षीच्या विवाह सोहळ्यात वाजविली जातात. मात्र, असे असले तरी या गीताची क्रेझ आजही कायम आहे. लग्नात वाजविणे हे गीत बंद झाले नाही. त्यामुळेच या गाण्याच्या निर्मितीला 56 वर्षे झाले असले तरी आजही गाण्याची क्रेझ कायम असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *