महाराष्ट्र

मोहदरी, चिंचोली शिवारात डोंगराला आग लागून २५ हेक्टर गवत खाक

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मोहदरी – चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत २५ हेक्टर वरील गवत जळून खाक झाले. याशिवाय मोठ्या झाडांनाही आगीची झळ बसली.‌ सोमवारी (दि.७) सकाळी १० वाजेच्या सुमारास चिंचोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालया शेजारीच असलेल्या डोंगराला अचानक आग लागल्याने. चाऱ्यासाठी असलेले संपूर्ण गवताळ कुरण आगीत भस्मसात झाले.
तालुक्यातील चिंचोली गावाच्या बाजूला डोंगर उताराला असलेल्या वन विभागाच्या क्षेत्राला सोमवारी सकाळी आग लागली. ही बाब ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्यानंतर वन विभागाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. येथील स्थानिक १५ ते २० ग्रामस्थांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. वन विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न अनेक तास सुरू ठेवला तरीही आग आटोक्यात आलेली नव्हती. डोंगरावर अग्निशामक वाहन जात नसल्याने अनेक अडचणी आल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वन परिक्षेत्रमंडळ अधिकारी सुजित बोकडे, वनविभागाचे वनरक्षक संजय गिते, गोविंद पंढरे आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आग लागल्यानंतर डोंगर उताराचा भाग असल्याने तेथे अग्निशामक बंबाचे वाहन येणे अशक्य होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी ओली बारदाने, फांद्या हातात घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले.‌ सर्वत्र वाळलेले गवत असल्याने गवताची हानी मोठ्या प्रमाणावर झाली. काही मोठ्या झाडांना आगीची झळ सोसावी लागली.
Gavkari Admin

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

8 hours ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

8 hours ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

9 hours ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

11 hours ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

1 day ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

1 day ago