महाराष्ट्र

मुंबईत मॉन्सूनचे आगमन

मुंबई तुंबली, मेट्रो स्थानकात पाणी घुसले, चाकरमान्यांचे हाल

मुंबई ः राज्यासह मुंबईतदेखील मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मॉन्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्डदेखील मोडला आहे. मुंबईकरांना सोमवारी (दि. 26) सूर्याचे दर्शनच घडल नाही. पावसामुळे रेल्वे, रस्ते आणि मेट्रो मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. मुंबईला सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. दुपारपर्यंत झालेला पाऊस आणि त्यानंतर असलेला मुसळधार पावसाचा अंदाज पाहता हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. जुलै, ऑगस्टमध्ये मुंबईत जितका पाऊस होतो, तितका यंदा मे महिन्यात झाला आहे.
राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सरासरी मॉन्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. यंदा मॉन्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. मॉन्सून याआधी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे. मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटे उशिराने सुरु होती. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरु होती. सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली. वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाची एक संरक्षक भींत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरलेे. या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. हे काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता.
खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. मुंबई पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मरिन लाईन लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाले. विद्युत वाहिनीवर झाड आल्याने त्याला देखील आग लागली. मुंबईत सकाळी 9 ते 10 दरम्यान
ढगफुटीसदृश पाऊस झाला. महापालिकेच्या काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर एका तासात 80 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. तर दक्षिण मुंबईतील एका स्टेशनवर 104 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आयएमडीनं सकाळी 9 ते 10 दरम्यान झालेला पाऊस हा ढगफुटी नसल्याचे सांगितले आहे. हा अतिमुसळधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोमवार(दि. 26) पासून सात दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. होता. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. सातारा आणि घाट परिसर, पुण्यातील घाट परिसर इथेदेखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरीत्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झाली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात
अडकले होते.

मुंबईत 107 वर्षांतला विक्रमी पाऊस
मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात 294 मिमी पाऊस
1918 च्या मे महिन्यात पडला होता 279 मिमी पाऊस
मुंबईत सकाळी 8.30 पर्यंतच्या 24 तासांत 135 मिमी पाऊस
मुंबईच्या उपनगरांत मात्र मेमध्ये आतापर्यंत 197 मिमी पाऊस

पाऊस अपडेट
खारघरमधील डोंगररांगांत फिरायला गेलेल्या 5 पर्यटकांना रेस्क्यू
 मंत्रालय आणि सरकारी कर्मचार्‍यांना लवकर सोडण्याचे आदेश
 वापसा आल्यावर पेरणी करा, कृषी विभागाचा शेतकर्‍यांना सल्ला
 मुंबईत सकाळी 9 ते 10 दरम्यान ढगफुटीसदृश पाऊस
 रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 91.33 मिमी पाऊस
 मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
 सातारा, पुण्यातील घाट परिसरातही रेड अलर्ट देण्यात आला.

 

Gavkari Admin

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

15 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

16 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

16 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

16 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

16 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

16 hours ago