नाशिक

शहरात 25 हून अधिक झाडे कोसळली

सुदैवाने जीवितहानी नाही, टास्क फोर्स मैदानात

नाशिक : प्रतिनिधी
शहरात मंगळवारी मध्यरात्री(दि. 7)पासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहराला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. मंगळवारी अग्निशमन विभागाकडे सकाळी सातपासून पंचवीसहून अधिक झाडे पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
पावसाळ्यात कुठेही झाडामुळे जीवितहानी होऊ नये याकरिता मनपाच्या उद्यान विभागाकडून धोकादायक झाडे व फांद्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत पाचशेहून अधिक झाडे धोकादायक असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी मात्र वीसहून अधिक ठिकाणी झाडे व फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाकडून या भागांत जाऊन ही झाडे हटवण्यात आली आहेत. शहरात अनेक ठिकाणी मुख्य वाहतुकीच्या रस्त्याशेजारी, कॉलनीअंतर्गत रस्त्याच्या कडेला गुलमोहर ही कमकुवत समजली जाणारी विदेशी प्रजातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. ही झाडे वरून मजबूत दिसत असली, तरी आतून झाड कच्चे झालेले असते. यापूर्वी शहरात गुलमोहरचे झाड रिक्षावर कोसळून दोघा नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मनपाने अशा झाडांची शोधमोहीम हाती घेतली होती. पावसाळ्यात शहरात कुठेही नागरिकांना अडथळे येऊ नयेत याकरिता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. सहाही विभागांत टास्क फोर्स असून, पावसाचे पाणी, ड्रेनेज लाइन, झाडे कोसळणे आदींसह पावसाळ्यात येणार्‍या आपत्तीवर उपाययोजना करण्याचे काम या फोर्सकडून केले जात आहे.

शहरात जेथे झाडे पडली किंवा त्यांच्या फांद्या कोसळल्याची तक्रार, माहिती देण्यात आली तेथे जाऊन सदर झाडे हटवण्यात आली आहेत.
– संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

दोन ठिकाणी घुसले पाणी
शहरात मंगळवारी रात्रीपासून कधी कमी, तर कधी मध्यम स्वरूपात सुरू असलेल्या पावसामुळे दोन ठिकाणी पाणी घुसल्याचे समोर आले. त्यात सोमेश्वर कॉलनी, गंगापूररोड येथे पाणी घुसले. दुसर्‍या ठिकाणी बोधलेनगर परिसरात एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले होते.

येथे वाड्याच्या भिंती कोसळल्या
रामवाडीत पुष्पक अपार्टमेंट भिंत कोसळली. कुठलीही जीवितहानी नाही.
जुन्या नाशिकमधील पॉवर हाउस, म्युझिक दरबार येथील मोबाइल गॅलरी भागात वाड्याची भिंत कोसळली. जीवितहानी नाही.

या भागांत कोसळली झाडे
1) लोकमान्यनगर, गंगापूर रोड. 2) फडोळ मळा, कुमावतनगर. 3) बडदेनगर, शिवाजी चौकात दुभाजकावर. 4) राजीवनगर बोगद्याजवळ, सम्राट स्वीटजवळ. 5) मॅरेथॉन चौक. 6) त्रिकोणी बंगला, हिरावाडी रोड. 7) शुभारंभ बंगला, पाथर्डी फाटा. 8) घारपुरे घाट, गोदावरीनगर. 9) प्रमोद महाजन गार्डनजवळ, कांचन सोसायटी. 10) माउली लॉन्स, मुरारीनगर, अंबड, गाडीवर झाड पडले. 11) आयटीआय सिग्नल ते कामगारनगर रस्ता. 12) आरटीओ ऑफिससमोर. 13) गामणे मळा, मखमलाबाद रोड. 14) फुलेनगर, पाटाजवळ घरावर चिंचेचे झाड पडले. 15) आयेशानगर पखाल रोड, द्वारका.

 

More than 25 trees fell in the city.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

6 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

6 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

7 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

7 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

7 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

7 hours ago