जुन्या वादातून मायलेकीवर कुर्‍हाडीने हल्ला; दोघी गंभीर

येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील घटना

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील उंदीरवाडी येथे जुन्या वादातून शेतात काम करणार्‍या मायलेकीवर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात संगीता दौंडे व मुलगी जयश्री दौंडे या मायलेकी गंभीर जखमी झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील उंदीरवाडी शिवारात दौंडे मायलेकी शेतात काम करत असताना संशयित प्रवीण ऊर्फ सोन्या अशोक जाधव याने पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघीही रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. या मायलेकीच्या अंगावर कुर्‍हाडीचे वर्मी घाव बसले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तातडीने येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी मायलेकीवर उपचार सुरू आहेत. मात्र, गंभीर जखमी जयश्री दौंडे हिची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित प्रवीण ऊर्फ सोन्या जाधव याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

 

Mother and daughter attacked with an axe following an old dispute; both critically injured.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *