नाशिक

मोटारसायकल चोरणार्‍यास रंगेहाथ अटक

वावी पोलिसांची कामगिरी; तीन दुचाकी हस्तगत

सिन्नर ः प्रतिनिधी
वावी येथून मोटारसायकल चोरून नेणार्‍या चोरट्याला वावी पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेत गजाआड केले असून, त्याच्याकडून वावीसह कोपरगाव व नाशिक परिसरातून चोरलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. गणेश गोरखनाथ दरेकर (वय 20 वर्षे, रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे.
वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने नाशिक
ग्रामीणचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य
मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधीकारी नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. वावी येथील फिरोज इस्माईल मणियार यांची यामाहा कंपनीची एमटी 15 मोटारसायकल (क्र.एमएच-17, सीटी-1276) 27 जानेवारी रोजी चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने गणेश दरेकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दरेकर याच्याकडून वावी येथून चोरलेल्या मणियार यांच्या मोटारसायकलसह कोपरगाव शहरातून चोरलेली रॉयल इनफील्ड बुलेट (चेसी नं. एमई 3 यू 355 सीएफएन 964263) व आडगाव, नाशिक येथून चोरलेली होंडा शाईन (चेसी नं. एमई 4 जेसी 65 डीजेकेडी 97649) अशा तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. दरम्यान, गणेश दरेकर याच्याविरोधात येवला शहर, त्र्यंबकेश्वर, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, त्याचीही उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष तपास पथकातील पोलिस अंमलदार गणेश पवार, सागर सारंगधर यांनी उल्लेखनीय कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण सोनवणे करीत आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago