उत्तर महाराष्ट्र

खासदार साहेब, आम्हाला या जाचातुन मुक्त करा..!

*गाडी बंद रस्ता बंद…? मनमाडला वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त खासदार साहेब आम्हाला या जाचातुन मुक्त करा…!*

मनमाड: आमिन शेख

– दुष्काळी आणि पाणीटंचाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहराची नवी ओळख निर्माण झाली असून मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शहराची नवी ओळख निर्माण झाली असून मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीत ज्याप्रकारे वाहतूक कोंडी होते त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ मनमाड शहरात देखील वाहतूक कोंडी होत आहे मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज मुळे सर्वात जास्त वाहतूक कोंडी होत असून या ब्रिजची परिस्थिती अशी आहे गाडी बंद रस्ता बंद या पुलावर एक छोटी जरी गाडी बंद पडली तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात खासदार साहेब या वाहतूक कोंडीच्या जासातून आम्हाला मुक्त करा अशी आर्त हाक मनमाड शहरातील नागरिकांनी खासदार भास्कर भगरे यांच्याकडे केली आहे
असं म्हणतात प्रत्येक शहराला काही ना काही ऐतिहासिक वारसा असतो त्या ऐतिहासिक वारशामुळे त्या शहराची ओळख निर्माण होते मनमाड शहराला आधीच दुष्काळी आणि पाणीटंचाईची झळ असल्याने त्याची देशभरात ओळख आहे मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून शहराला वाहतूक कोंडीमुळे नवी ओळख निर्माण झाली असून शहरातून जाणारा इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रोज वाहतूक कोंडी होते मनमाड शहरातील नागरिक या वाहतूक कोंडीला कंटाळले असून या आधी देखील मनमाड शहरातून बायपास व्हावा यासाठी तत्कालीन आमदार पंकज भुजबळ व तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता भूमी अधिग्रहण पर्यंत काम झाले होते मात्र घोडे कुठे आडले हे आजपर्यंत समजू शकले नाही मनमाड शहरातील भोळी भाबडी जनता अजूनही हा बायपास होईल या आशेवर बसली आहे मनमाड शहराची अवस्था अत्यंत बिकट असून शहरातून जाणाऱ्या इंदूरपणे महामार्गावर असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज वर एक जरी गाडी बंद पडली तर थेट संपूर्ण रस्ता बंद होतो यामुळे शहरातील नागरिक जास्त प्रमाणात त्रस्त आहेत मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूरपणे महामार्गावर एक तर बायपास करा किंवा शक्य होत असेल तर उड्डाणपूल करा अशी मागणी मनमाडकर यांच्यावतीने अनेकदा करण्यात आली आहे मनमाड शहरातील नागरिकांनी खासदार भगरे यांच्याकडे देखील अनेकदा मागणी केली असून खासदार साहेब या वाहतूक कोंडीच्या जाचातून आम्हाला मुक्त करा अशी आर्त हाक मनमाड शहरातील नागरिकांच्या वतीने बग खासदार भगरे यांच्याकडे लगावण्यात आली आहे खासदार भास्कर भगरे यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास 500 कोटी पेक्षा जास्त रस्त्यांना मंजुरी मिळवून आणली आहे व त्याचे काम देखील तात्काळ सुरू झाले आहे याच धर्तीवर मनमाड शहरातील इंदूर पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा बायपास यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मनमाड शहरांच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

 

◆ही आहेत वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे
◆ मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गचा मालेगाव येथून कट होऊन मनमाडमार्गे सोपा रस्ता असल्याने वाहनचालकांची पहिली पसंती असलेला महामार्ग
◆धुळे छत्रपती संभाजी नगरला जोडणारा कन्नड घाट वाहतुकीसाठी बंद
◆मालेगाव नांदगाव मार्गे छत्रपती संभाजी नगरला जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था
◆मनमाड मार्गे पुणे सोलापूर बेळगावला जाण्यासाठी सोपा आणि बिनाघाट असलेला महामार्ग
◆मोजकेच टोल आणि रस्ता चांगला असल्याने या महामार्गाचा जास्तीचा वापर…
◆इंदूर पुणे महामार्गावर मनमाड शहरात असलेला अत्यंत छोटा रेल्वे ओव्हरब्रिज

Bhagwat Udavant

Recent Posts

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

22 minutes ago

सिन्नर पालिकेत 15 प्रभागांत निवडून येणार 30 नगरसेवक

प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…

26 minutes ago

मनमाडला प्रभागरचनेबाबत कहीं खुशी कहीं गम

नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…

31 minutes ago

त्र्यंबकेश्वरला सुट्ट्यांमुळे व्यवस्था कोलमडली

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…

36 minutes ago

जनआक्रोश मोर्चाची तयारी; मनसे, शिवसेना ठाकरे गटाचे विभागवार मेळावे

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…

39 minutes ago

एमडी विक्री करणारे तीन आरोपी अटकेत

एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…

44 minutes ago